ladki bahin yojana june installment date: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुन महिन्याच्या हप्त्याची सर्वच लाभार्थी महिला अनेक दिवसांपासून वाट पाहत होत्या. जून महिना संपला तरी देखील हप्ता जमा न झाल्याने सर्वच महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते. परंतु निधीच्या कामतरतेमुळे जूनच्या हप्ता येण्यास विलंब झाला असल्याचे दिसत आहे. पण अखेर आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे. कारण आजपासुन लाडक्या बहिणींना जुन महिन्याचा जमा होणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे . (Good news for beloved sisters; June installment will be deposited from today! Minister Aditi Tatkare gave the information. ladki bahin yojana june installment)
लाडक्या बहिणींना जुनचा हप्ता मिळावा म्हणुन सरकारने अनुसुचित जाती घटकांसाठीचा निधी वळवण्यास अखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणीच्या हप्त्याचा विषय मार्गी लागला आहे. याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून दिली आहे. त्यामुळे महिलांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेऊ नये.
ladki bahin yojana june installment। जुनचा हप्ता रु. 2100 येणार कि रु. 1500
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुनचा हप्ता आजपासून जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून दिली आहे. परंतु महिलांना जुनचा हप्ता रु. 2100 येणार कि रु. 1500 येणार याबाबत अनेक अफवा सोशल मीडियावरती येत आहेत. पण या अफवांवरती विश्वास न ठेवता सर्वच लाडक्या बहिणींनी खऱ्या अपडेट ॲग्रीवाडा वरती पाहाव्यात.
ladki bahin yojana june installment date । मंत्री मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे. अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून दिली.
Good news for beloved sisters; June installment will be deposited from today! Minister Aditi Tatkare gave the information. ladki bahin yojana june installment date








