---Advertisement---

Knada deshi daru favarni | कांदा पिकावर देशी दारू फवारणीचे फायदे ! फक्त या गोष्टी टाळा

By Agriwada Team

Published on:

Follow Us
---Advertisement---

Knada deshi daru favarni : शेतकरी मित्रांनॊ शेती करत असताना शेतकऱ्यांन समोर अनेक अडथळे येत असतात. अशा सर्वच अडथळ्यांवर मात करत शेतकरी शेती करत असतो. तसेच शेतीमध्ये येणाऱ्या अडथळ्यांना अनेक प्रकारचे प्रयोग करून सोडवत देखील असतो. शेतकरी शेतीमध्ये जसे शेत मशागतीसाठी जुगाड करत असतो. तसेच जुगाड हे आपल्या शेतामधील पिकांवरती देखील करत असतो. यातलाच एक प्रयोग म्हणजे देशी दारू फवारणीचा प्रयोग आहे.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर आपण सर्व पाहातच असतो की अनेक शेतकरी आपल्या शेतामधील पिकावर देशी दारूची फवारणी घेत असतात. यातीलच सर्वात चर्चेचा विषय म्हणजे कांदा पिकावर देशी दारू फवारणीचे फायदे? याचं विषया बाबत आज आपण समजून घेणार आहोत, की कांदा पिकावर देशी दारू फवारणी मागील विज्ञान, फवारणी पद्धत आणि वापराचे फायदे काय आहेत.

कांदा पिकावर देशी दारू (Knada deshi daru favarni )फवारणीचे फायदे !

कांदा पिकांमध्ये जेव्हा थेट देशी दारूची फवारणी घेतली जाते. तेव्हा अनेक शेतकऱ्यांना द्याचे चांगले परिणाम पाहायला मिळाले आहेत. अनेकांच्या मते जसे दारू पिल्यांनंतर माणसाला एक वेगळीच ऊर्जा येते तशीच ऊर्जा कांद्यामध्ये येत असते. कांद्याची पात हिरवीगार दिसायला सुरवात होते. त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या कांदा पिकावर देशी दारूची फवारणी घेत असतात.

देशी दारू मधील कोणते घटक कांद्यासाठी फायदेशीर?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, देशी दारूमध्ये असलेले प्रमुख पाच घटकांमुळे कांद्याची साईझ होण्यास मदत होते. तसेच पिळा रोग असेल रस शोषक किडी असतील यांपासून कांदा पिकाचे संरक्षण होण्यास मदत होते. त्यामुळे कमी खर्चात शेतकऱ्यांना अधिक उत्पादन काढता येते. कांदा स्ट्रॉंग असल्याने फवारण्यांचा खर्च वाचतो.

१ . पहिला घटक :- लैक्टिक एसिड बॅक्टरीया Lactic Acid Bacteria (LAB)

देशी दारूमध्ये 5% ते 6% टक्के लैक्टिक एसिड बॅक्टरीया असतात. ज्या कांदा पिकासाठी पोषक घटकांची उपलब्धता करून देतात. त्यामुळे आपला कांदा पोसण्यास मदत होते. तसेच कांद्याची साईझ करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत.

२ . दुसरा घटक :- ऑरगॅनिक ऍसिड Organic Acids

देशी दारू मधील दुसरा उपयुक्त घटक म्हणजे ऑरगॅनिक ऍसिड आहे. देशी दारू मध्ये याचे प्रमाण 3% ते 4% टक्के असते. हे ऍसिड आपली जमीन स्वच्छ करण्याचे काम करते. त्यामुळे आपला कांदा कोणत्याही रोगाला बळी पडत नाही.

३ . तिसरा घटक :- प्रातिनिधिक सजीव – किण्व Yeast (Saccharomyces)

प्रातिनिधिक सजीव – किण्व याचे देशी दारूमध्ये 5 % ते 10 % टक्के एवढे प्रमाण असते. याच्या वापराने जमिनीमधील उपयुक्त मायक्रोब (पोषक तत्वे ) वाढण्यास मदत होते. याचा आपल्या कांद्याला चांगला फायदा होताना दिसतो. तसेच जमीन देखील सुधारण्यास मदत होते.

४ . चौथा घटक :- पाणी

शेतीमधील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पाणी आहे. देशी दारू मध्ये 55% ते 60% टक्के पाणी असल्याने कांदा पिकाला एक चांगला सोल्व्हेन्ट म्हणून फायदा होतो.

५ . पाचवा घटक :- गुळ अवशेष sugars

जमिनीमधील सूक्ष्म जीवांची संख्या वाढवते. त्यामुळे कांदा पिकाचे उत्पादन वाढण्यास मदत होते.

कांद्यावर देशी दारू फवारणी (Knada deshi daru favarni ) वेळी कोणत्या गोष्टी टाळाव्यात ?

१ . कांदा पिकावरती देशी दारू फवारणी करताना अल्कहोलचे प्रमाण कमी असणारी दारू वापरावी. कारण अल्कहोल कांदा पिकासाठी कोणतेच अन्नघटक देत नाही.

२ . देशी दारू फवारणी करत असताना. त्याचे प्रमाण जास्त वापरू नये. अतिरिक्त प्रमाण वापरल्यास आपल्या पिकाला धोका निर्माण होऊ शकतो.

३ . देशी दारूची फवारणी ही सकाळी किंवा संध्याकाळीच करावी.

वापराचे प्रमाण :- प्रति १ ५ लिटरसाठी – 40 ते 50 मिली असावे. Knada deshi daru favarni

---Advertisement---

Leave a Comment