PradhanMantri Shrmyog Mandhan Yojana 2026 : 18 ते 40 वयोगटातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील बांधकाम मजूर, रिक्षाचालक, माथाडी कामगार अशा सर्वच क्षेत्रातील कामगारांना सरकार पेन्शन देणार आहे. जेणेकरून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करता येईल. त्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना देखील राबवत आहे. यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PM-SYM) जी सरकारने नुकतीच जाहीर केली आहे. या योज़नेच्या अंतर्गत केंद्र सरकार असंघटित कामगारांना दरमहा 3000 हजार रुपये देणार आहे. या बाबतचा मेसेज देखील अनेक कामगारांना आला आहे.
दरम्यान, तुम्हीजर 18 ते 40 वयोगटातील असाल, तर ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. ज्या कामगारांना निर्वाह निधी किंवा इतर कोणत्याही योजनांची पेन्शन मिळत नसेल अशा सर्वच कामगारांसाठी ही योजना एक वरदान ठरणार आहे. त्यामुळे या लेखात आपण या योजनेची पात्रता, फायदे अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.
PradhanMantri Shrmyog Mandhan Yojana 2026 : या योजनेसाठी कोण पात्र आहे?
- वयोमर्यादा :- ज्या नागरिकांचे वय 18 ते 40 वर्षे आहे असे सर्वच लोक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- असंघटित म्हणजे नेमका कोणता वर्ग :-
- शेतकरी
- शेतमजूर
- रिक्षा चालक
- फेरीवाले
- घरकाम करणारे
- इत्यादी असंघटित नागरिक
3. उत्पन्न मर्यादा :- ज्या कामगारांचे उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा कमी असेल अशाच नागरिकांना अर्ज करता येणार आहे.
4. लाभ कोणाला मिळणार :- ज्या नागरिकांना इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही. अशाच नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
५ . आवश्यक कागद पत्रे :-
- आधारकार्ड
- बँक बचत खाते
- मोबाईल नंबर
कोणाला मिळणार 3000 हजार रुपये पेन्शन
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ( PradhanMantri Shrmyog Mandhan Yojana ) ही संघटित नागरिकांसाठी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना देखील योदान द्यावे लागणार आहे. ज्यावेळी नागरिकाचे वय 60 वर्षे पूर्ण होईल त्यावेळी नागरिकाला दरमहा 3000 रुपये दिले जातील. म्हणजेच या योजनेमध्ये नागरिक 55 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. तेवढीच रक्कम हे सरकार हे नागरिकांच्या योजनेत जमा करणार आहे.
उदाहरणासह समजून घेऊयात :-
| वय (सहभागी होताना) | तुमचे मासिक योगदान (रुपये) | सरकारचे मासिक योगदान (रुपये) | एकूण जमा (दरमहा) |
| 18 वर्षे | 55 | 55 | 110 |
| 25 वर्षे | 80 | 80 | 160 |
| 30 वर्षे | 105 | 105 | 210 |
| 35 वर्षे | 150 | 150 | 300 |
| 40 वर्षे | 200 | 200 | 400 |
योजनेचे फायदे काय आहेत?
- योजना धारकाचा मृत्यु झाल्यास त्याच्या परिवाराला 50 % म्हणजेच 1500 रुपये दरमहा पेन्शन दिली जाईल.
- काही कारणांमुळे तुम्हाला योजनेतून बाहेर पडावे लागल्यास तुमच्या पैशाच्या एकूण रक्कमेसह व्याज जेवढे होईल तेवढे दिले जाईल.
अर्ज कसा करावा
- नागरिक स्वतःच्या मोबाईल वरून देखील अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा.
- आपल्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रा ( CSC ) मध्ये जाऊन अर्ज करू शकतात.








