---Advertisement---

Fertilizer price list: खतांच्या दारात मोठी वाढ, पहा DAP, NPK खतांचे नवे दर

By Agriwada Team

Updated on:

Follow Us
---Advertisement---

Fertilizer price list : सध्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला पावसाचे ग्रहण लागल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी भागात पाण्याची टंचाई झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे खरीप हंगाम सुरु होऊन देखील कमी पावसामुळे तसेच पावसावर एल निनोचे ग्रहण लागल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट येण्याची वेळ आलेली दिसत आहे. अशातच सरकारने शेतकऱ्यांना एक मोठा आर्थिक दणका दिला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावरच रासायनिक खतांच्या किमतीमध्ये 100 ते 500 रुपयांपर्यंतची दर वाढ केली आहे.

दरम्यान, शासनाने जाहीर केलेल्या रासायनिक खतांच्या किमतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटामध्ये संपण्याची दाट शक्यता असून शेतकऱ्याच्या खिशावर याचा थेट ताण येणार आहे. शेतकऱ्यांनी आपली फसवणूक होऊ नये म्हणून शासनाने जाहीर केलेले नवीन दर यादी पहावी आणि इतर शेतकऱ्यांना देखील पाठवावी. खतांचे नवीन दर खालील प्रमाणे दिलेले आहेत.

खतांचे नवीन दर (प्रति बॅग ) :

खतांचे प्रकार जुने दर वाढीव नवीन दर
युरिया 266266
डीएपी 13501350
एमओपी 15501950 ते 2050
एसएसपी 550600 ते 650
15:15:1516502025
16:16:1614701750
10:26:2619001900
20:20:0014751800
24:24:0019002200
28:28:0017502250
14:35:1418502350
12:32:1619002300
08:21:2119752100
09:24:2419002200

खत महागण्याची करणे:

  • अंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या मालाची होणारी दर वाढ यामुळे खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किंमतीत वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.
  • तसेच इराण अमेरिका युद्धामुळे इंधन दर वाढ झाल्याने वाहतूक खर्चात वाढ झाल्याने.
  • वाढलेल्या महागाईमुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याने खतांचे बाजारभाव वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

कृषी विभागाने जाहीर केलॆल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या पोषकत्त्व आधारित अनुदान (एनबीएस ) योजने अंतर्गत सरकार खतांवर मोठ्या प्रमाणात अनुदान देत आहे. युरियावर प्रति गोणी 2200 रुपये एवढे अनुदान दिले जात आहे. तसेच डीएपीच्या गोणी वरती 1639 रुपये एवढे अनुदान देत आहे.

दरम्यान, एन पी केच्यातसेच गंधक या पोषकतत्वावर अनुक्रमे 47.32 रुपये, 52.76 रुपये , 2.38 रुपये आणि 3.16 रुपये अनुदान निश्चित केले आहे. या अनुदानामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

---Advertisement---

Leave a Comment