---Advertisement---

शेतकऱ्यांसाठी गुड न्युज! आता या शेतकऱ्यांना मिळणार 15,000 हजार रुपये मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा । pm kisan yojana & namo shetkari yojana

By Agriwada Team

Published on:

Follow Us
---Advertisement---

नामो शेतकरी योजनेचा हप्ता आता 3000 येणार

pm kisan yojana & namo shetkari yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता बिहार मधुन शेतकऱ्यांच्या खात्या मध्ये जमा करण्यात आला आहे. या योज़ने मधुन केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर वर्षी 6000 रुपये देते. आत्ता पर्यंत या योजनेचे 19 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील नमो शेतकरी योजना सुरु केली आहे. ( Good news for farmers! Now these farmers will get 15,000 thousand rupees big announcement of Chief Minister. pm kisan yojana & namo shetkari yojana )

दरम्यान, नमो शेतकरी योजनेचे (namo shetkari yojana) आत्ता पर्यंत 5 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. त्याचं बरोबर आता शेतकरी 6 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. परंतु 6 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्या आधी मुख्यमंत्र्यानी शेतकऱ्यांसाठी एका गुड न्युजची घोषणा केली आहे. भारतीय अर्थसंकल्पा पुर्वी अनेक शेतकरी पीएम किसनच्या हत्यामध्ये वाढ होईल असे सांगत होते परंतु त्या सर्व अफवा फेल गेल्या.

परंतु, नमो शेतकरी योजनेच्या (namo shetkari yojana) हप्त्यांमध्ये तब्ब्ल 3000 हजार रुपयांची वाढ होणार असल्याची घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पीएम किसान योज़नेचे 6000 हजार आणि नमो शेतकरी योजनानेचे 9000 हजार रुपये असे शेतकऱ्यांना आता वार्षिक 15000 रुपये दिले जाणार आहेत. याची घोषणाच मुख्यमंत्र्यानी केली आहे. ते बिहार मधील पीएम किसनच्या 19 व्या हप्ता वितरणा वेळी नागपूर हुन ऑनलाईन हजर होते.

त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेत ( namo shetkari yojana ) 3000 हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे. पूर्वी या योजने मधुन शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जायचे आता त्यामध्ये 3000 रुपये अजुन ऍड करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारचे 6000 आणि राज्य सरकारचे 9000 हजार रुपये असे मिळुन वार्षिक 15000 रुपये दिले जाणार आहेत.

पुढील हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार नाही 
  • ज्या शेतकऱ्यांनी आपली ई – केवायसी पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.
  • ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर आयडी काढला नाही अशा शेतकऱ्यांचा देखील हप्ता बंद केला जाईल.
  • घरातील एकाच व्यक्तीला पीएम किसान योज़नेच लाभ घेता येईल.
  • ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याला जोडले नसेल तर त्या शेतकऱ्यांना देखील हप्ता मिळणार नाही.

Good news for farmers! Now these farmers will get 15,000 thousand rupees big announcement of Chief Minister. pm kisan yojana & namo shetkari yojana

---Advertisement---

Leave a Comment