---Advertisement---

महाराष्ट्र हादरला! कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी विकली किडनी । Karj fednyasathi kidney vikali

By Agriwada Team

Published on:

Follow Us
---Advertisement---

कर्जापायी चंद्रपुरातील शेतकऱ्यावर आली किडनी विकण्याची वेळ

Kidney Vikali । राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच सततच्या हवामान बदला मुळे सध्या राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती हलाकीची झाली आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यतील शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर दिवसेंनदिवस वाढतच चाललेला असून अनेक शेतकऱ्यांना आपली जमीन विकून सरकारी आणि सावकारी कर्ज फेडावं लागत आहे. (Maharashtra is shocked! Farmers sold their kidneys to repay loans.)

दरम्यान, विदर्भातील चंद्रपूरहुन आलेल्या आशाच एक बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. चंद्रपुरातील मिथुन (ता. नागभीड ) मधील शिवदास कुडे या शेतकऱ्याने सावकाराकडून १ लाख रुपये घेतले होते. परंतु कर्ज मुदती मध्ये न फेडल्याने चक्रव्याजाने १ लाख रुपयांचे ७४ लाख रुपयांचा कर्जाचा डोंगर झाला. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी शिवदास कुडे या शेतकऱ्याने चक्क आपली किडनी ८ लाखाला विकल्याचे माध्यमांना सांगितले आहे.

या घटनेमुळे विदर्भ मराठवाड्यासहीत संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्यामुळे आता पुन्हा राज्यतील शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा प्रश्न समोर आला आहे. त्यातच आता कर्ज फेडीसाठी शेतकऱ्याला आपली किडनी विकावी लागल्याने सर्वच क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे. अखेर सरकार शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे कधी लक्ष देणार आहे.

नेमकं सावकाराकडून कर्ज घेतलं का?

शिवदास कुडे या तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी शेती करण्याचे ठरवले. त्यांनतर शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला अन् त्यासाठीच त्याने गाई विकत घेण्यासाठी सावकाराकडून ५ ० -५ ० हजार असे दोन टप्प्यामध्ये १ लाख सावकाराकडून घेतले. परंतु दुर्दैवाने त्याने घेतलेल्या गाई आजाराने दगावल्यामुळे तो अडचणीत आला.

दरम्यान, त्यामुळेच सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले. परंतु सावकाराने मात्र त्याच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावला. अन् एक लाख रुपयांचे कर्ज चक्रव्याजाने तब्ब्ल ७४ लाखावर पोहचले. कर्ज फेडण्यासाठी शिवदास कुडे या शेतकऱ्याने स्वतःची शेती आणि मोटार सायकल देखील विकली परंतु कर्जाचा डोंगर काही कमी झाला नाही. अशातच सावकाराने त्याला किडनी विकून कर्ज फेडण्याचा सल्ला दिला.

त्यामुळे शिवदास कुडे याने आधी कोलकत्ता नंतर कंबोडियाला जाऊन ८ लाख रुपयांना आपली किडनी विकल्याचे माहिती माध्यमातून समोर आली आहे. त्यामुळे कर्ज माफी हा विषय किती गंभीर आहे, हे समोर आले आहे. ( kidney vikali )

---Advertisement---

Leave a Comment