MPSC PSI Bharti 2025 : पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्वच इच्छुक उमेदवारांची प्रतीक्षा आता संपली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (maharashtra public service commission) अंतर्गत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. (Police Sub Inspector Recruitment Government Advertisement Famous: Total Posts – 392 | MPSC PSI Bharti)
दरम्यान, त्यामुळे आता राज्यभरातील 392 पोलीस उपनिरीक्षकाच्या (PSI) रिक्त जागा भरल्या जाणार असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदाचा तपशील तसेच पात्रता व अधिकृत जाहिरात खाली पाहावी.
MPSC PSI Bharti 2025 : पात्रता व इतर माहिती
वयोमर्यादा:- पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी उमेदवाराचे किमान वय 01 नोव्हेंबर 2025 पर्यंत 19 वर्षे पूर्ण असायला हवे. तर खुल्या प्रवर्गासाठी 31 वर्षे असायला हवे. त्याच बरोबर इतर मागास वर्गीयांसाठी वेगवेगळे निकष आहेत ते उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीमध्ये पाहावेत.
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज पद्धती : पोलीस उपनिरीक्षक पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यास सुरवात :- 14 ऑगस्ट 2025 पासुन उमेदवारांना आपला ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे.
महत्वाची सूचना :-अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत PDF पाहावी.
| अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Police Sub Inspector Recruitment Government Advertisement Famous: Total Posts – 392 | MPSC PSI Bharti
maharashtra public service commission








